Marathi Assignment for Class 7 A & B


युद्धवार्ताहर म्हणून मी कामाला सुरुवात केली, तेव्हा युद्धभूमी वरचे वास्तव किती दाहक असते याची मला कल्पना नव्हती .हे काम करताना आलेले बहुसंख्य अनुभव मन विषण्ण करणारे होते .वीस वर्षे विविध वृत्तपत्रांकरता काम केल्यानंतर या सर्व अनुभवांबद्दल लिहावे असे मनात आले. कामाला आरंभ केला; परंतु दैनंदिन कामांमुळे त्यात सतत व्यत्यय येत राहिला. तेव्हा पत्रकारितेच्या जबाबदारीतून मुक्त होऊन पूर्णवेळ लेखनासाठी देण्याचा मी संकल्प सोडला. प्रस्तुत कादंबरी ही त्याच संकल्पाची फलश्रुती आहे.


⬆️वरील उताऱ्यात ठळक केलेल्या शब्दांचे अर्थ पुढे दिले आहेत. योग्य अर्थापुढे योग्य शब्द लिहा.⬇️


फळ➖
अडथळा➖
वेगवेगळे➖
मोकळे➖
सुरुवात➖
लढाईच्या ठिकाणचे➖
सगळे➖
बरेचसे➖
खरी परिस्थिती➖
ज्याबद्दल बोलत आहोत ते➖
रोजचे➖
खिन्न,उदास➖
ठरविले➖
लढाईचा बातमीदार➖
जाळणारे,चटके देणारे➖

 Posted by Smt. Vaishali Porate

Previous Post Next Post